घर Pimpri-Chinchwad नोटाबंदीचे चटके आजही कष्टकऱ्यांना, सामान्यांना – काशिनाथ नखाते.

नोटाबंदीचे चटके आजही कष्टकऱ्यांना, सामान्यांना – काशिनाथ नखाते.

173
0

पिंपरी दि. ८ – नोटबंदीने होणारे गंभीर परिणामाचा कसलाही विचार न करता पंतप्रधानाने केलेल्या ५००,१००० रू.च्या नोटबंदिला आज ६ वर्षे पूर्ण झाली. काळा पैसा बाहेर आला नाही व भ्रष्टाचार कमी झाला नाही . ९९.३ % नोटा रिझर्व बँकेत परत आल्या. याउलट ऊर्जा, पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान, व औद्योगिक क्षेत्रात मोठी बेरोजगारी वाढली, आर्थिक व्यवहार ठप्प झाले, छोटे-मोठे उद्योग बंद पडले त्यामुळे कामगारांच्या हातचे काम केले , नोटाबंदीच्या गंभीर चटके आजही कामगार व सामान्यांना बसत आहेत अशी टीका कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

नोटाबंदीच्या झळा या विषयावर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघाचे मेळाव्यात बोलत होते . यावेळी अनंत मोरे,संजय जाधव,अनिल कदम,राजेश माने,सुनीता पोतदार, कलावती पाल,अर्चना कांबळे,वहिदा शेख,लता भोर,विजयापाटील,मनीषा शिंदे,सीमा शिंदे,वैशाली इजगज आदी उपस्थित होते .

नोटाबंदींने काळा पैसा बाहेर येईल या उद्देशाने झालेली बंदी सपशेल अपयशी ठरली.
रांगेत उभे राहून असंख्य निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला . रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितलं की ९९.३ % नोटा या परत बँकेत आल्या आहेत . चलनात असलेल्या नोटा पैकी १५ लाख ३१ हजार कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. याचाच अर्थ असा की अचानक व चुकीच्या पद्धतीने घेतला गेलेला निर्णयामुळे असंख्य रोजगार नष्ट झाले , हजारो छोटे – मोठे उद्योग, व्यावसाय बंद पडले. नोटाबंदीनंतर सलग तीन वर्ष बेरोजगारीचा दर ६.९ % वर पोहोचला होता. मागील काही वर्षांमधील हा दर सर्वाधिक होता एकंदरीत नोटबंदीने बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वसामान्यांना अडचणीत टाकले आहे,यात सामान्य जनतेची प्रचंड परवड झाली अनेकांचे जीव गेले , देशाचे झालेले नुकसान मोदी सरकार भरून देणार का हाच प्रश्न सर्वसामान्य आजही विचारत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा