घर Pimpri-Chinchwad कोमल काळभोर-शिंदे यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय समाजभूषण” पुरस्कारासाठी निवड

कोमल काळभोर-शिंदे यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय समाजभूषण” पुरस्कारासाठी निवड

339
0

पिंपरी : ठाणे येथील झुंजार केसरी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा पंडित दीनदयाल उपाध्यय समाजभूषण पुरस्कार यंदा पिंपरी चिंचवडच्या अष्टपैलू महिला कोमल काळभोर – शिंदे यांना जाहीर झाला आहे. सामाजिक, राजकीय, उद्योग आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाद्दल त्यांना हा पुरसौकार जाहीर झाला आहे असे झुंजार केसरी या संस्थेचे मुनिर खान यांनी सांगितले. झुंजार संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दि. १३ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाणार आहे. गौरवपत्र,स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

झुंजार केसरी संस्थेचे मुनीर खान यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने कोमल काळभोर शिंदे यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. झुंजार केसरी संस्थेतर्फे सहकार, शिक्षण, प्रशासन, सामाजिक, राजकीय, लोककला, क्रीडा, पत्रकार, कृषी, आरोग्य आणि धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करून सामाजिक लौकिकात भर घालणाऱ्या अनमोल रत्नांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते.
कोमल काळभोर-शिंदे यांना यापूर्वी अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत, त्या श्रीक्षेत्र आळंदी देवाची येथील सामाजिक कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या कन्या असून पिंपरी चिंचवड शहरात निगडी प्राधिकरण येथे त्या स्थायिक झालेल्या आहे, उद्योग क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलेला आहे, तसेच उद्योग क्षेत्राबरोबर त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे, भाजपाच्या आमदार उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली कार्य करत आहेत, तसेच लहानपणापासून त्या किक बॉक्सिंग आणि कराटे या क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून आपलं नावलौकीक केले आहे. त्यांना अनेक पदके प्राप्त झालेले आहे, अगामी नेपाळ येथे होणाऱ्या जागतिक मिक्स बाॅक्सिंग चॅम्पियन स्पर्धेत मुलींच्या भारतीय संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना झुंजार केसरी या संस्थेच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय समाजभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे, त्यांचे सर्व स्तरांकडून स्वागत होत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा