घर India भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ चिंचवडमध्ये पदयात्रा

भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ चिंचवडमध्ये पदयात्रा

377
0

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रात दाखल होत आहे. या यात्रेच्या समर्थनार्थ चिंचवडमध्ये पदयात्रा काढण्यात आल्याचे कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.
चिंचवड येथील क्रांतिवीर चाफेकर बंधु यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ कॉंग्रेसच्या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम व ज्येष्ठ नेते मानव कांबळे यांच्यासह माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, माजी शिक्षण मंडळ सभापती अभिमन्यू दहितुले, महिला शहराध्यक्ष सायली नढे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, मागासवर्गीय शहराध्यक्ष विजय ओव्हाळ, सेवादल शहराध्यक्ष वीरेंद्र गायकवाड, भाऊसाहेब मुगुटमल, निर्मला खैरे, डॉ. मनीषा गरुड, प्रियंका कदम, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, शितल सिकंदर, वैशाली शिंदे, शिल्पा गायकवाड, प्रा.किरण खोजेकर, मिलिंद फडतरे, जेव्हीयर ॲन्थोनी, पांडुरंग जगताप, सुधाकर कुंभार, निखिल भोईर, युनूस बागवान, चंद्रकांत काटे, आण्णा कसबे, सचिन सोनटक्के, सौरभ शिंदे, किरण नढे, इरफान शेख, सुरज गायकवाड, आकाश शिंदे, संदीप शिंदे, शंकर ढोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी यांची यात्रा कन्याकुमारी ते काश्मीर अशी आहे. ७ नोव्हेंबरच्या सुमारास ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे. तीन हजार पाचशे किलोमीटर अंतर चालत १५० दिवसांत १३ राज्यांमधल्या जनतेला ते आपलंस करू पहात आहेत. नवचैतन्याची आशा सर्वदूर फुलवण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आणि गरजेचा आहे. देशातील विषमतेचे वातावरण, धर्म आणि जातीमधील तेढ विरोधात ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची शहरात जनजागृती व्हावी म्हणून ही पदयात्रा काढण्यात आली असल्याचे कॉंग्रेस शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा