घर Pimpri-Chinchwad पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम; एकाच दिवसात पकडल्या 1501...

पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम; एकाच दिवसात पकडल्या 1501 वीज चोऱ्या

231
0

पुणे : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागात नुकतीच एक दिवशीय वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबविण्यात आलेली असून पुणे, बारामती व कोल्हापूर परिमंडळात वीज चोरीचे एकूण 1501 प्रकरणे उघडकीस आले आहेत.

ही मोहीम प्रादेशिक संचालक श्री अंकुश नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेली असून फक्त एकाच दिवसात बारामती परिमंडळात वीज चोरीची 893 प्रकरणे तर पुणे परिमंडळात 174 व कोल्हापूर परिमंडळात 434 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आलेली आहे.

या मोहिमेत एकूण 11127 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आली. यात वीज चोरीचे एकूण 1153 प्रकरणे उघडकीस आलेली असून विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

तसेच अनधिकृत वीज वापराचे एकूण 348 प्रकरणे उघडकीस आलेली असून विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 126 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

प्रादेशिक संचालक श्री नाळे यांनी वीज चोरीच्या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून यामुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे. तसेच यापुढे वीज चोरीविरुद्ध नियमितपणे मोहीम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा