घर Uncategorized ‘ रोटरी क्लब, पिंपरी ‘ तर्फे साहसी व्यक्तींचा सत्कार

‘ रोटरी क्लब, पिंपरी ‘ तर्फे साहसी व्यक्तींचा सत्कार

206
0

पिंपरीः रोटरी क्लब ही संस्था नेहमीच सामाजिक ध्येयासाठी प्रसिद्ध आहे. समाजासाठी काही तरी वेगळे करणाऱ्या समाजबांधवांना अधिकाधिक प्रोत्साहन देणे, कठीण प्रसंगी पाठीशी उभे राहणे, असे नेहमीच प्रेरणादायी काम करणाऱ्या ‘ रोटरी क्लब ऑफ पिंपरी’ च्या पदाधिकारी मंडळाने आज ‘ कझागिस्तान 2022’ मधे सहभागी होवून आपल्या शहराच्या लौकिककामध्ये भर घालणाऱ्या काही साहसी आयर्न मॅन चा सत्कार केला.
कझाकित्सान ‘ आयर्न मॅन 2022 ‘ मध्ये सहभागी होऊन या स्पर्धेत विक्रमी कामगिरी करणाऱ्या वैभव ठोंबरे, रोहित क्षिरसागर, सचिन वाकडकर, पांडुरंग बोडके आणि पिंपरी चिंचवडचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राम गोमारे या पाच स्पर्धा विजेत्या आयर्न मॅन ना आज रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आपल्या क्लबच्या वतीने प्रास्ताविक व्यक्त करताना अध्यक्ष संजय प्रधान यांनी रोटरी क्लबचे ध्येय धोरणांची थोडक्यात मांडली, तर सचीव संतोष गिरंजे यांनी पुढील उपक्रमाची माहिती दिली.या छोटेखानी सोहळ्याचे सूत्रसंचालन सचिव संतोष गिरंजे यांनी तर आभार प्रदर्शन रो मनीष फरांदे यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा