घर Maharashtra Special सुसंस्कृत पुण्याच्या लौकीकाला गालबोट लावण्याचा प्रकार : अमोल थोरात

सुसंस्कृत पुण्याच्या लौकीकाला गालबोट लावण्याचा प्रकार : अमोल थोरात

312
0

– स्वागत कमानीला काळे फासल्याच्या कृतीचा भाजपाकडून निषेध
– केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा दौरा विरोधकांना झोंबला

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची ओळख देश पातळीवर ‘सुसंस्कृत शहर’ अशी आहे. मात्र, केवळ राजकीय विरोधासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या स्वागत कमानीला काळे फासण्यात आले, ही बाब पुणेकरांच्या लौकीकाला गालबोट लावणारी आहे, अशी टीका भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री निर्मला सितारामण बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्त खडकवासला विधानसभा मतदार संघातील भाजपाचे आमदार भीमराव तापकीर आणि त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी स्वागत  कमानी उभारल्या आहेत. त्यावर अज्ञातांनी रात्री काळे फासले आहे. धनकवडीतील अहिल्यादेवी चौकात हा प्रकार घडला आहे.

यापार्श्वभूमीवर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी निषेध केला आहे. ते म्हणाले की, बारामती मतदासंघातील भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी दिली आहे.  सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथील शिवछत्रपती सभागृहात खडकवास मतदार संघाच्या वतीने आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त गुरुवारी स्वागतपर कमान लावण्यात आली होती. या प्लेक्स कमानीवर काही समाजकंटकांनी रात्रीतून काळे फासले. याचा आम्ही पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे तीव्र निषेध करीत आहोत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा