घर Pimpri-Chinchwad महापालिकेच्या वतीने शहरातील युवक आणि युवतींसाठी मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार...

महापालिकेच्या वतीने शहरातील युवक आणि युवतींसाठी मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

242
0

पिंपरी, दि. १३ सप्टेंबर २०२२ : महापालिकेच्या वतीने शहरातील युवक आणि युवतींसाठी मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

औद्योगिक नगरी तसेच इन्फॉरमेशन टेक्नोलॉजी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक वसाहतीत अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत.  या कंपन्यांना लागणारे मनुष्यबळ पुरवण्यासाठी तसेच शहरातील युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी  महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शुक्रवार दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्या मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.  दहावी, बारावी, आयटीआय तसेच विविध विद्याशाखांमधून पदवीधर झालेल्या इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जात संख्येने महापालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपस्थित राहून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा