घर Pimpri-Chinchwad महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी केली स्पर्धेतील गणेश देखाव्यांची पाहणी

महानगरपालिकेच्या अधिकार्यांनी केली स्पर्धेतील गणेश देखाव्यांची पाहणी

250
0

पिंपरी, दि. ८ सप्टेंबर २०२२:- महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या वतीने जिल्ह्यांतील सर्वोत्कृष्ठ मंडळांना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यासाठी २सप्टेंबर २०२२तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. त्यामध्ये पर्यावरण पूरक मूर्ती, प्लास्टिक व थर्माकोल विरहित सजावट, ध्वनीप्रदूषण विरहित वातावरण, समाजप्रबोधनपर देखावे, अंधश्रद्धा निर्मुलन,पाणी वाचवा, मुलगी वाचवा,सामाजिक सलोखा,स्वातंत्र्य चळवळी संदर्भात देखावे,रक्तदान शिबीर,वैद्यकीय सेवा शिबीर,विद्यार्थी- महिला यांच्या करीता उपक्रम, त्याप्रमाणे देखावे पहायला येणाऱ्या भाविकांसाठी  सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय,स्वच्छतागृह, प्रथमोपचार, वाहतुकीचा अडथळा होणार नाही यासाठी केलेले सुयोग्य नियोजन असे निकष शासनाने स्पर्धेसाठी घालून दिले होते. प्रत्येक जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अधिकारी यांची एक समिती गठीत करण्यात आली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड परिसरातील स्पर्धेत  सहभागी  १६ गणेशोत्सव मंडळांची आज पाहणी करण्यात आली आणि निकष तपासण्यात आले.

समिती पाहणी दौर्‍यात महापालिकेचे उपायुक्त रविकिरण घोडके,अजय चारठाणकर, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आरोग्य  कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे ,आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल,जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, देवेंद्र मोरे,खुशाल पुरंदरे सहभागी झाले होते. गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी  केलेल्या बहुविध उपक्रमांची समितीला माहिती दिली..

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा