“विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबर कौशल्य आधारित कोर्सेस करावे.” – अधिष्टाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, प्राचार्य डॉ. मनोहर चासकर
५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शिक्षक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबर कौशल्य आधारित शिक्षण घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांना शिक्षक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तर डॉ. रामदास लाड,यांनी प्रास्ताविक केले आणि डॉ. मोहन चौधरी, डॉ. मधुकर राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी कु. रतनहरी फड आणि युवराज राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, डॉ. एच. बी. सोनावणे, डॉ. पद्मावती इंगोले, डॉ. अपर्णा पांडे, डॉ. सुधीर बोराटे, डॉ. संतोष जगताप, प्रा. पावसे बी.के., डॉ. रणजिता चटर्जी आदी प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास लाड, डॉ. दत्तात्रय भांगे, डॉ. सारिका मोहोळ, डॉ. मधुकर राठोड, प्रा. कृष्णा शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामदास लाड, कु. श्रद्धा खिलारे, समृद्धी चव्हाण, पायल परदेशी, आरती साळवे, प्राची सूर्यवंशी, वैष्णवी पुरी, निकिता मोरे, धारा राठोड, शाहीन बागवान, श्रद्धा खिलारे, ऐश्वर्या शाह, शशी चतुर्वेदी, प्रतीक्षा कोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार कु. चेतन लिम्हन आणि गोविंद देशमुख यांनी केले.