घर Uncategorized महापालिकेतील अधिकारी व अभियंते यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी –...

महापालिकेतील अधिकारी व अभियंते यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करण्याची मुख्यमंत्र्याकडे मागणी – रमेश नानासाहेब वाघेरे

257
0

पिंपरी – चिंचवड महापालिकेतील शहर अभियंता मकरंद निकम , सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, सह:शहर अभियंता पर्यावरण संजय कुलकर्णी , सह:शहर देवाण्णा गट्टुवार, कार्यकारी अभियंता उद्यान स्थापत्य सुनील वाघुंडे , कार्यकारी अभियंता संजय घुबे, कार्यकारी राजेंद्र राणे तेसच निवृत्त झालेले शहर अभियंता राजन पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी के अनिल रॉय यांच्या बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करा व दोषी आहे आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी रमेश नानासाहेब वाघेरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वरील उल्लेख केलेले अभियंते व अधिकारी यांचे मोठ मोठ्या उद्योगपती हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेते यांच्या बंगल्याला लाजवेल असे बंगले आहेत. काहींच्या बंगल्यांना दोन – दोन लिफ्ट आहेत . काही अभियंत्यांच्या नावे मावळात तसेच मूळ गावी स्वतःच्या तसेच इतर नातेवाईकांच्या व जवळच्या मित्रांच्या नावावर कित्येक एकर जमीन आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील नातेवाईकांच्या ही बेहिशेबी मालमत्तेची चौकशी करावी, अशी मागणी रमेश नानासाहेब वाघेरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

यातील काही अभियंते यांनी दरवर्षी आपल्या उत्पन्नाचे व मालमत्तेचे विवरणपत्र महापालिकेला सादर करणे आवश्यक असताना दिलेले नाही. त्यांनी आपली संपत्ती महापालिकेपासून लपवली आहे. त्यामुळे अशा प्रकारे बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्या अभियंते व अधिकारी यांची स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी करणे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणे ही विनंती, अशी मागणी रमेश नानासाहेब वाघेरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा