घर Pimpri-Chinchwad प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मंगळागौर अनोखा उपक्रम

प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात मंगळागौर अनोखा उपक्रम

312
0

चिंचवड : संस्कृतीचा वसा अविरत चालू ठेवण्यासाठी चिंचवड येथील कमला एज्युकेशन  संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थिनी, महिला पालक व महिला शिक्षिकांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे आयोजन केले होते.

आजच्या युवतींना  हिंदू धर्मातील चालीरीती, प्रथा, परंपरा यांची ओळख  तसेच मंगळागौरीच्या  पारंपरिक खेळांची माहिती व्हावी हा कार्यक्रमाचा उद्देश होता. मंगळागौरीची रीतसर पूजा, आरती करून सगळ्यांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद लुटला. यामध्ये  उखाणे,झिम्मा, फुगडी,दंड फुगडी, बसफुगडी, अगोटा-पागोटा,होडी ,लाट्या बाई लाट्या, गाठोडं ….अशा अनेक खेळांचा समावेश होता.यामध्ये महिला शिक्षकवृंद, महिला पालक प्रतिनिधी आणि  विद्यार्थिनीनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विविध खेळांचा मनमुराद आनंद घेतला.  कार्यक्रमाच्या शेवटी  महिला पालकांनी  कार्यक्रमात महिला पालकांनाही सहभागी करून घेतल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त करून आभार मानले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ वनिता कुऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमास सांकृतिक विभाग प्रमुख प्रा. चिन्मयी जैन, प्रतिभा आर्ट सर्कलच्या प्रमुख प्रा.स्नेहा भाटीया, प्रा. वर्षा निगडे व प्रा. तृप्ती बजाज यांनी पूर्णत्वास नेले.
कमला शिक्षण संकुल या संस्थेच्या अध्यक्षा मा. प्रतिभा शहा व संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा यांनी या कार्यक्रमास विशेष प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुरेखा कुंभार यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा