घर India पी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताची चौथ्या स्थानी मुसंडी

पी व्ही सिंधूची ‘सुवर्ण’ कामगिरी, राष्ट्रकुल स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताची चौथ्या स्थानी मुसंडी

247
0

पी व्ही सिंधू हिने सरळ सेट्समध्ये कॅनडाच्या खेळाडूवर मात करत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचा (Commonwealth Games) आज, ८ ऑगस्ट रोजी शेवटचा दिवस आहे. संपूर्ण स्पर्धेच्या वाटचालीप्रमाणे या दिवशीही भारताची दमदार कामगिरी सुरूच आहे. अखेरच्या दिवशी बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू हिने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. पी व्ही सिंधू हिने सरळ सेट्समध्ये कॅनडाच्या खेळाडूवर मात केली आहे. या पदकासह भारताच्या खात्यात आतापर्यंत एकूण ५६ पदकं आहेत.

बॅडमिंटनमधील महिला एकेरीचा अंतिम सामना भारताची पी व्ही सिंधू आणि कॅनडाची मिशेल लीशी यांच्यामध्ये रंगला होता. या लढतीत कॅनडाच्या मिशेल लीशीचा पी व्ही सिंधू हिने २१-१५, २१-१३ असा पराभव केला. या विजयासह भारताने १९ व्या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

पी व्ही सिंधूने पहिला गेम २१- १५ अशा मोठ्या फरकाने जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्येही पी व्ही सिंधूने सामन्यावर पकड ठेवत विजय मिळवला. दुसऱ्या खेळात २१- १३ अशा फरकाने कॅनडाच्या मिशेल लीशीचा सिंधूने पराभव केला. विशेष म्हणजे सिंधूला २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकदाही अपयश आलेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा