मुंबई : राज्य सरकारने आज मोठे निर्णय घेत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल 50 हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मात्र जे शेतकरी नियमित कर्ज फेड करतात त्यांच शेतकऱ्यांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. तर 50 हजार रुपयांचं हे अनुदान शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर देण्यात येणार आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
जे शेतकरी नियमित पीक कर्ज परतफेड करत होते. मात्र त्यांना काही जाचक अटींमुळे हे अनुदान मिळत नव्हते. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच प्रशासनाला निर्देश दिले आहेत. तसेच कोल्हापूर, सांगलीतील पूर आलेल्या शेतकऱ्यांना देखील अनुदान देण्यात येणार आहे.