घर Politics बाळासाहेबांना गुरुदक्षिणा म्हणून शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं…

बाळासाहेबांना गुरुदक्षिणा म्हणून शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं…

283
0

मुंबई : उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड पुकारत एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा गट सोबत घेत भाजपशी हात मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली. अचानक झालेल्या या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामधील संबंध दुरावले गेले. यातच शिवसेना नेत्या दिपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्या होत्या.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यायला हवं, अशी अपेक्षा यावेळी दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलं आहे. दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे गटाने भाजपाला हाताशी धरत राज्यात सत्ता प्रस्थापित केली.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. नुकतेच शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली असावी, या चर्चांना आता उधाण आलं आहे.

बाळासाहेबांना गुरुदक्षिणा म्हणून शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावं, अशी अपेक्षाही दिपाली सय्यद यांनी बोलून दाखवली. माझ्यासोबत सर्व शिवसैनिकांची ही अपेक्षा आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा