घर Pimpri-Chinchwad पुणे, पिंपरीमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पुणे, पिंपरीमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

309
0

पुणे : पुणे शहर आणि परिसरात या चार पाच दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळेव हवामान विभागाने ( गुरुवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिल्याने उद्या (गुरूवारी) पुणे शहरातील सर्व शाळांना) सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राथमिक व माध्यमिक शाळेला तसेच खाजगी शाळेला सुट्टी जाहीर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिले आहेत.

मुसळधार पाऊस असताना विद्यार्थ्यांच्या शाळेत पोहोचताना अनेक अडचणी येत आहेत. स्कूलबस, व्हॅन विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि शाळा सुटल्यानंतर घरी सोडण्यासाठी ही विलंब होत आहे. अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांना कोणताही फटका बसू नये यासाठी पुणे महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.

पिंपरी चिंचवड क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस पडत असून येत्या दोन दिवसात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यामार्फत वर्तवण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बालवाडी / प्राथमिक / माध्यमिक तसेच सर्व खाजगी शाळेना (अनुदानित, विनाअनुदानित, अंशत : अनुदानित) ता. १३ ते १४ जुलै पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा