घर Pimpri-Chinchwad महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप

महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांना नाहक मन:स्ताप

340
0

– भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांची टीका
– इंद्रायणीनगर परिसरात वीज समस्यांबाबत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

पिंपरी । प्रतिनिधी
महावितरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे इंद्रायणीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. तसेच, विद्युत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे, अशी टीका भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक भागात महावितरण प्रशासनाकडून अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित केला जात आहे. तसेच, ज्या भागात वीजेचा वापर जास्त आहे. त्याठिकाणी सात ते आठ तास लोडशेडिंग केले जात आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात नागरिकांना असाह्य उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे म्हणाले की, महावितरणच्या दुरूस्ती वाहनावरील कर्मचारी फोन उचलत नाहीत. कदाचित फोन उचलला तरी सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
विद्युत कर्मचारी नागरिकांनी फोन उचलला तरी नागरिकांना खोटी माहिती दिली जाते. त्यानंतर पुन्हा कॉल केला असता, प्रतिसादच मिळत नाही. याबाबत जाब विचारला असता, ‘‘आमची  बदली करण्यात यावी’’ अशी उद्धटपणे उत्तरे मिळतात. यामुळे नागरिकांमधील असंतोष वाढत आहे, असेही राजेंद्र लांडगे यांनी म्हटले आहे.
**
तांत्रिक अडचणी सोडवण्यात प्रशासन अपयशी…
शहरात ठिकठिकाणी वीजवाहिन्यांना शॉर्ट सर्किट होवून नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. मिनी फीडर नादुरूस्त झाले आहेत. केबल दुरुस्तीच्या कामासाठी लवकर ठेकेदार उपलब्ध होत नाही. त्यामुळे दुरूस्तीची कामे रखडली आहेत. शहरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण याच्या तुलनेत वीज पुरवठा यंत्रणा सक्षम करण्यात आलेली नाही. राज्य सरकारच्या उर्जा मंत्रालयाकडून महावितरणच्या पायाभूत सुविधांबाबत दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्टया सक्षम नसल्यामुळे महावितरण प्रशासन वीज पुरवठ्याबाबत चांगली सेवा देण्यात अपयशी ठरत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा