घर Pimpri-Chinchwad प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी येथे “कंपनी सेक्रेटरी” व्यावसायिक कोर्स बद्दल माहिती...

प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी येथे “कंपनी सेक्रेटरी” व्यावसायिक कोर्स बद्दल माहिती देणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले.

450
0
प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी वाणिज्य विभाग आणि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “कंपनी सेक्रेटरी कसे व्हावे” या विषयावर ते मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी मार्गदर्शन करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया चे सदस्य कंपनी सेक्रेटरी सोहल ठाकूर, विश्वनाथ कोटे, आर. यू. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे प्राचार्य डॉ अभय खंडागळे, उपप्राचार्य डॉ. बी. जी. लोबो, परीक्षा नियंत्रक प्रा. आर.बी. नागरे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. पद्मावती इंगोले, डॉ. रामदास लाड आदी उपस्थित होते. डॉ. रामदास लाड यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली.
यावेळी व्याख्यात्यानी कंपनी सेक्रेटरी होण्यासाठी नोंदणी कशी करावी, त्याचे वेळापत्रक, फी, विषय, तसेच भविष्यातील नोकरीच्या आणि व्यवसायाच्या संधी याबद्दलची सविस्तर माहिती दिली.
व्याख्यानाचे आयोजन डॉ. रामदास लाड, प्रा. विकास जगताप, प्रा. ओंकार कवडे यांनी केले तर प्रा. सपना बिराजदार, प्रा. कोकीळ, प्रा. गौड, डॉ. संतोष वाढवणकर, प्रा. येरंडे, यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा