घर Pimpri-Chinchwad ब्रह्मचैतन्य क्रेडिट सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा आणि ब्रह्मचैतन्य दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ उत्साहात ...

ब्रह्मचैतन्य क्रेडिट सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा आणि ब्रह्मचैतन्य दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ उत्साहात पार पडला

280
0

पिंपरी, ता. ३० : काळेवाडी येथील ब्रह्मचैतन्य क्रेडिट सोसायटीच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा आणि ब्रह्मचैतन्य दिनदर्शिकेचा प्रकाशन समारंभ नुकताच चिंचवड येथे उत्साहात झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, यदुराजशास्त्री पारेकर उपस्थित होते. याव्यतिरिक्त नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी समितीचे माजी सभापती कैलास थोपटे, ब्रह्मचैतन्य परिमंडलचे प्रमुख विश्वस्त पुष्पराज गोवर्धन, अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, अक्कलकोट स्वामींच्या शिष्या सुंदराबाई काडगावकर यांचे खापरपणतू श्रीपाद
काडगावकर, सोसायटिचे अध्यक्ष शंकर कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीपाद यांची कन्या श्रध्दा हिचा पाहिल्याच प्रयत्नात ‘सीए’ ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ, स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी ब्रह्मचैतन्य दिनदर्शिकेचे प्रमुख पाहुणे गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आनंदीबाई डोके सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी वयाची एकषष्ठी पूर्ण केल्याबद्दल गोविंद कुलकर्णी, पुष्पराज गोवर्धन, राजन बुडूख, बह्मचैतन्य परिमंडलचे सल्लागार वासुदेव कुलकर्णी, कार्यकारी सदस्य मधुकर रामदासी आदींचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटीच्या सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या. दिलीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस अनुपमा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. परिमंडलचे उपक्रम प्रमुख श्यामकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.

यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांच्या हस्ते हिंदू दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्या आले. यावेळी डावीकडून दिलीप कुलकर्णी, यदुशास्त्री पालेकर, बाबासाहेब त्रिभुवन, पुष्पराज गोवर्धन, श्रीपाद काडगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा