घर Pimpri-Chinchwad राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने महामेट्रो ऑडिटची मागणी

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने महामेट्रो ऑडिटची मागणी

280
0

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली महामेट्रो संचालक श्री नवीन अगरवाल यांना CMRS & SAFETY ऑडिट रिपोर्ट ची मागणी.

दिनांक ६ मार्च रोजी होणाऱ्या मेट्रो चे उद्घाटन व लोकार्पण कार्यक्रमास देशाचे पंतप्रधान , राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री , अधिकारी व सामान्य नागरिक उपस्थित राहणार आहेत. याच पूर्वसंध्येवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष इम्रान भाई शेख यांच्या वतीने CMRS & SAFETY ऑडिट रिपोर्ट ची मागणी.

यावेळी इम्रान शेख म्हणाले की CMRS & SAFETY ऑडिट रिपोर्ट हे अद्याप महामेट्रो अधिकाऱ्यांना प्राप्त झाले नाहीत अशी शक्यता आहे परंतु आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सत्ताधारी भाजपमधील नेतेमंडळी यांनी हे उद्घाटन करण्याचे ठरविले आहे. असे करणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या व उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे.

जर CMRS & SAFETY ऑडिट रिपोर्ट हे महामेट्रो अधिकाऱ्यांना प्राप्त झालेले असतील तर त्यांनी ते आम्हाला दाखवावे व अजूनही या प्रत प्राप्त झालेल्या नसतील तर उद्घाटन सोहळा पुढे ढकलून CMRS & SAFETY ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर मेट्रो चे उद्घाटन करावे अशी मागणी यावेळी इम्रान शेख यांनी केली.

यावेळी राष्ट्रवादी युवक चे नारायण पाटील,अमोल रावळकर, प्रशांत काळे, सतेज परब, विनय शिरसागार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा