घर Pimpri-Chinchwad संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने बुद्धीभेद करणे अयोग्य – अजित गव्हाणे  

संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने बुद्धीभेद करणे अयोग्य – अजित गव्हाणे  

331
0
– राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेले वक्तव्य अतिशय वादग्रस्त आहे. राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. असे असतानाही संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असा बुद्धीभेद करणे योग्य नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद पडताना दिसत आहेत. सर्वच स्तरातून राज्यपाल्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, “राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित हीच त्यांची निती आणि शिकवण होती.
समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झालीच नाही. त्याबाबत औरंगाबद खंडपीठाने निर्णय दिलेला आहे. अशा परिस्थिती संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असा बुद्धीभेद करणे योग्य नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे. राज्यपालांनी हे वक्तव्य तातडीने पाठीमागे घ्यावे असे गव्हाणे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा