घर Entertainment ४ वर्षीय युक्तास ‘रायजिंग स्टार’ टॅलेंट शो मध्ये प्रथम पारितोषिक

४ वर्षीय युक्तास ‘रायजिंग स्टार’ टॅलेंट शो मध्ये प्रथम पारितोषिक

1094
0

पिंपरी : प्रतिभेचा वयाशी कोणताही संबंध नसतो. अगदी लहान वया पासून प्रभावी कामगिरी करणारी कितीतरी उदाहरणे आपल्याकडे आहेत. अवघ्या सोळाव्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सचिन, कुमारवयात आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या लता मंगेशकर यांची कारकिर्द याच गोष्टीचा दाखला आहेत. अशीच एक प्रतिभासंपन्न युक्ता हिने आपल्या अद्वितीय प्रतिभेने रायजिंग स्टार टॅलेंट शो मध्ये सर्वांना प्रभावित केले आहे.

रहाटनी मध्ये राहत असलेल्या युक्ता सुबोध वामने हिने शिवाजी महाराजावरती पोवाडाचे गायन करून रावेत येथे आयोजित केलेल्या रायजिंग स्टार टॅलेंट शो मध्ये प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे.

 

यावेळी रेडिओ मिरचीचे आर. जे. राहुल यांच्या हस्ते युक्तास पारितोषिक देण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा