घर Pimpri-Chinchwad पिंपरी चिंचवड शहरातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी...

पिंपरी चिंचवड शहरातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क साधावा

330
0

 

पिंपरी, दि. २५ फेब्रुवारी २०२२ :- पिंपरी चिंचवड शहरातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाला संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युक्रेन देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी नवी दिल्ली येथे मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

*नवी दिल्ली येथील मदत कक्ष*

केंद्रीय परराष्ट्रमंत्री कार्यालय, नवी दिल्ली, टोल फ्री क्र. 1800118797

दूरध्वनी क्र. 011-23012113 / 23014105 / 23017905

फॅक्स 011-23088124 ई मेल situationroom@mea.gov.in

*पुणे जिल्ह्यातील नागरिक किंवा विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक*

जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे दूरध्वनी 020-26123371

ई मेल controlroompune@gmail.com

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा