घर Pimpri-Chinchwad शहर युवक काँग्रेस चे भाजपा विरोधात ‘माफी मांगो आंदोलन’

शहर युवक काँग्रेस चे भाजपा विरोधात ‘माफी मांगो आंदोलन’

384
0

(संसदेतील मोदींच्या महाराष्ट्र व काँग्रेस विरोधी वक्तव्याचा निषेध)

निगडी दि. २२,
पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संसदेतील महाराष्ट्र राज्य व काँग्रेस पक्षा बद्दल केलेल्या अपमानाकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज भाजपाचे माजी खासदार अमर साबळे यांच्या निगडी येथील निवासस्थाना समोर माफी मांगो आंदोलनाद्वारे निर्दशने करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशानुसार मोदींच्या या चुकीच्या व खोडसाळ वक्तव्या विरोधात दि. १९ फेब्रुवारी ते दि. २२ फेब्रुवारी या कालावधीत पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राची माफी मागावी या साठी हे माफी मांगो आंदोलन राज्य भर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

आज निगडी प्राधिकरण परिसरातील माजी खासदार अमर साबळे यांच्या
घरासमोर शहर युवक काँग्रेस चे कार्यकर्ते दुपारी १२ वाजता एकवटले व जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी मोदी व भाजपाचा निषेध व्यक्त केला या वेळी मोदींनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.

या वेळी बोलताना काँग्रेस चे
शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम म्हणाले,
“महाराष्ट्र राज्य व काँग्रेस पक्ष हे देशात कोरोना पसरवायला जबाबदार आहेत असे वक्तव्य संसदेत करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला अपमानित करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, वास्तविक पाहता श्रमिक स्पेशल ट्रेन सूरू करून मोदी सरकारनेच अधिक प्रमाणात कामगारांची वाहतूक घडवली व महाराष्ट्रावर बेजाबदारपणे मजूरांची हेळसांड केली असे आरोप केले भाजपा च्या पंतप्रधानांनीच नमस्ते ट्रम्प सारखे प्रचंड मोठे कार्यक्रम आयोजित करून कोरोना पसरण्यास वाव दिला व मोदी सपशेल खोट बोलत काँग्रेस ला व महाराष्ट्राला बदनाम करत आहेत देशाची संसद हे देशाचे सर्वोच्च सभाग्रह व केंद्रीय कायदेमंडळ आहे या पवित्र ठिकाणी पंतप्रधान पदा सारख्या उच्चस्पद व्यक्तीने असे खोटे बोलणे हे लोकशाहीत अत्यंत खेदजनक आहे व हे सहन केले जाणार नाही मोदींनी त्वरित महाराष्ट्राची माफी मागावी” असे कदम म्हणाले.

युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान मोदी वारंवार खोटे बोलतात हे दूर्दैवी आहे व तेच मोदी आता महाराष्ट्राची व काँग्रेस ची बदनामी करतात हे संताप जनक आहे, महाराष्ट्र ही छत्रपती शिवजी महाराजांची जन्मभूमी आहे या महाराष्ट्राने कायम देशाला दिशादर्शक विकास व वैचारीक वारसा दिला आहे व याच महाराष्ट्रातील सरकारने कोरोना निर्मुलनात केलेले काम हे उत्तम असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे व काँग्रेस च्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढाकार घेत धारावी पॅटर्न राबविला व तो जागतिक पातळीवर कोरोना निर्मुलनासाठी अत्यंत मार्गदर्शक सिध्द झाला असे असतानाही व उलट मोदी सरकारच्याच
गैर नियोजनामुळेच कोरोना आजार वाढला व पसरला गेला देशातील विमानतळे सुरूच राहीली परदेशी नागरीक देशात आले व कोरोनाचा पार्दुभाव वाढत गेला त्यानतंर चुकीच्या पध्दतीने कोणतेही नियोजन न करता अचानक पणे सर्वत्र लॅाकडाऊन लादण्यात आले व कामगार मजुरांची मोठी हेळसांड झाली व ते अगदी चालतच मूळगावी घरांकडे निघाले. पुढील काळातही आजारपण वाढताना आरोग्य व्यवस्थेचे विविध राज्यातील नियोजन पाहता आरोग्य सुविधांअभावी मृत्यूचे प्रमाण वाढत गेले व देशात मृत्यूचे थैमान सुरू झाले, मग ख-या अर्थाने कोरोना प्रसारास जबाबदार मोदी न भाजपा सरकार आहे व याउलट जाऊन जनतेची दिशाभूल करत मोदींनी केलेल्या वक्तव्याबाबत देशाची माफी मागावी” असे बनसोडे म्हणाले.

या प्रसंगी शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले व त्यांनी

माफी मांगो,माफी मांगो,
नरेंद्र मोदी माफी मांगो !, नरेंद्र मोदी मुर्दाबाद !,
महाराष्ट्र के सन्मान मे, काँग्रेस पार्टी मैदान मे !,
माफी मागा, माफी मागा, महाराष्ट्राची माफी मागा !,
शर्म करो,शर्म करो,
नरेंद्र मोदी शर्म करो !

अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव गौतम आरकडे, कार्याध्यक्ष दिलीप पांढारकर, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी विधानसभा काँग्रेस चे अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड विधानसभा काँग्रेस अध्यक्ष माऊली मलशेट्टी,भोसरी विधानसभा काँग्रेस चे अध्यक्ष दिनकर भालेकर, माजी नगरसेवक विश्वास गजरमल, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष विरेंद्र गायकवाड, एन एस यु आय चे शहराध्यक्ष डॅा.वसीम ईनामदार, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, सुनिल राऊत, के.हरिनारायणन, तानाजी काटे, भाऊसाहेब मुगुटमल, स्वप्निल बनसोडे, अबूबक्र लांडगे, तारीक रिझवी, रवी नांगरे, रवी कांबळे, विजय ओव्हाळ, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष नासीर चौधरी, चिचंवड विधानसभा युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिपक भंडारी, निखिल भोईर, युनुस बागवान, झेवियर ॲंन्थोनी, बाबा बनसोडे, किरण नढे, सुरज गायकवाड, हरिष डोळस, जयकर गायकवाड, मिलिंद वाघमारे, गुंगा क्षीरसागर, पांडूरंग जगताप, भास्कर नारखेडे,आण्णा कसबे आदि पदाधिकारी व बहूसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा