घर India साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ जणांना सुनावली फाशी

साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी ३८ जणांना सुनावली फाशी

333
0

अहमदाबाद: सन २००८ च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ४९ पैकी ३८ आरोपींना विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात तब्बल ८० जणांवर आरोप ठेवण्यात आले. या दहशतवादी हल्ल्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए आर पटेल यांनी या प्रकरणातील अन्य ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

दि. ८ फेब्रुवारी रोजी गुजरात न्यायालयाने ४९ आरोपींना दोषी ठरवले आणि २८ जणांची निर्दोष मुक्तता केली. तब्बल १३ वर्षांहून अधिक काळ या खटल्याचे कामकाज चालले.

अहमदाबाद शहरात २६ जुलै २००८ रोजी 70 मिनिटांच्या कालावधीत झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमध्ये २०० हून अधिक जण जखमी झाले. बंदी घातलेल्या स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दहशतवादी संघटनेच्या इंडियन मुजाहिदीन (IM) शी संबंधित दहशतवादी या स्फोटांमागे असल्याचचा दावा पोलिसांनी केला होता.

इंडियन मुजाहिद्दीन (IM) च्या दहशतवाद्यांनी गुजरातमधील गोध्राकांडानंतर झालेल्या सन २००२ च्या दंगलीचा बदला म्हणून हे स्फोट घडवून आणले होते असा आरोप आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा