घर Politics ‘… म्हणून मतांच्या ठेकेदारांचे दुखले पोट’

‘… म्हणून मतांच्या ठेकेदारांचे दुखले पोट’

442
0

सहारणपूर: आपल्या सरकारने मुस्लीम महिलांना तिहेरी तलाकच्या भयातून मुक्त केल्याने मुस्लीम महिला खुलेपणाने मोदीसमर्थक बनल्या. त्यामुळेच मतांच्या ठेकेदारांचे पोट दुखू लागले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदी यांनी मुझफ्फरनगरमध्ये मोठ्या निवडणूक प्रचारसभेत भाषण केले.

यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. आपल्या ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान ५ मिनिटे खास मुस्लिम महिलांबाबत बोलले. मुस्लीम भगिनी आणि मुलींवर अत्याचार होऊ नयेत यासाठी योगी सरकार आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

विकासाच्या प्रक्रियेत महिला व मुलींचा सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. मुस्लिम भगिनी आणि मुलींना आमचा हा स्पष्ट हेतू चांगलाच लक्षात आला आहे. आम्ही मुस्लिम भगिनींना तिहेरी तलाकच्या अत्याचारातून मुक्त केले. मुस्लिम बहिणी आणि मुलींवर अत्याचार होऊ नयेत यासाठी मुस्लिम भगिनींनी आपल्याला उघडपणे पाठिंबा दिला आहे, असा दावाही पंतप्रधानांनी केला. भाजप सरकारने मुस्लिम महिलांना तिहेरी तलाकच्या छळापासून वाचवले, असे पंतप्रधान म्हणाले. भाजपला उघडपणे मुस्लिम भगिनी आणि मुलींचा पाठिंबा मिळू लागला. मुस्लिम मुलींनी भाजपच्या समर्थनार्थ व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. त्या भाजप सरकारचे गुणगान करू लागल्या. शतकानुशतकेत्यामुळे मतांच्या ठेकेदारांची झोप उडाली. ते अस्वस्थ होऊ लागले, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा