घर National International सैन्याच्या शौर्यावर सवाल खपवून घेणार नाही: राजनाथ

सैन्याच्या शौर्यावर सवाल खपवून घेणार नाही: राजनाथ

315
0

मथुरा: भारतीय सैन्याच्या शौर्यावर प्रश्न उपस्थित करणारे नेते जनता खपवून घेणार नाही, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. चीन-पाकिस्तान संबंधांवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना राजनाथ म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काळात दोन मोठी अतिक्रमणे झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

राहुल यांना इतिहासाची माहिती नाही का, असा सवाल करून राजनाथ म्हणाले की, जेव्हा पाकिस्तानने शक्सगाम खोरे चीनला दिले तेव्हा जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते. एवढेच नाही तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये काराकोरम महामार्ग बांधला गेला तेव्हा पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे नव्हते. इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. आणि राहुल गांधी म्हणतात की भाजपच्या चुकीच्या परराष्ट्र धोरणांमुळे पाकिस्तान आणि चीन जवळ आले आहेत. ‘चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झाला.

समाजवादी पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोपही राजनाथ यांनी केला. सपा तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. राजकारण राष्ट्र उभारणीसाठी केले पाहिजे, केवळ सरकार स्थापनेसाठी नाही. धर्म आणि जातीचे राजकारण भाजपला मान्य नाही, असेही ते म्हणाले. पूर्वी उत्तर प्रदेशात फक्त दोन ते चार वैद्यकीय महाविद्यालये होती. योगी सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालय असेल, असा निर्णय घेतला असून आज राज्यात ५९ वैद्यकीय महाविद्यालये आहेत, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा