घर Maharashtra Special मुलींवर आणि महिलांवरील अत्याचार, हल्ले थांबविण्यासाठी ‘शक्ती कायदा’ लवकर लागू होणे आवश्यक…...

मुलींवर आणि महिलांवरील अत्याचार, हल्ले थांबविण्यासाठी ‘शक्ती कायदा’ लवकर लागू होणे आवश्यक… डॉ.नीलम गोऱ्हे

399
0

तळेगाव येथील एकतर्फी प्रेमातुन झालेल्या घटनेच्यानंतर प्रतिक्रिया

पुणे दि.२८: तळेगाव जि. पुणे येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर तरुणाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत पोलीसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचे समुपदेशन करून, पुढे असे गुन्हा करणार नाही असे बॉण्ड लिहून घेतले होते. यामध्ये पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीवर विधानपरिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी समाधान व्यक्त केले. तरी देखील अशा घटना थांबविण्यासाठी ‘शक्ती कायदा’ लवकरात लवकर लागू होणे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

तसेच कुटुंबातुन देखील मुलांचेवर संस्कार होणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट मिळाली नाही तर मुले आक्रस्ताळेपणा करतात. त्यावेळी पालकांनी मुलांच्या मध्ये संयम व विवेक राहण्यासाठी संस्कार करणे आवश्यक असल्याचे मत देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले. असे होत नसेल तर शक्ती कायदा लवकर लागू होणे आवश्यक असल्याचा पुनरुच्चार डॉ गोऱ्हे या घटनेच्या अनुषंगाने केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा