राज्यात आज 93 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल लागला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात भाजपला काही ठिकाणी जागा मिळा्ल्या आहेत. बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे असा संघर्ष नेहमी पाहायला मिळतो. यंदा धनंजय मुंडे यांना भाजपने धक्का दिला आहे. बीडमधील पाचही नगरपंचायतींमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी बाजी मारली आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. फक्त पालकमंत्रीपद असून चालत नाही, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.
भाजप विरोधात नाही..जनतेचा कौल आम्हालाच!
भारतीय जनता पार्टी राज्यात विरोधात नाही. लोकांनी भाजपला मतदान केलं होतं. मात्र, राजकीय समिकरणांमुळे महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र, भाजपा जनतेच्या मनातील पक्ष आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांवर परिणाम झाला. आम्ही ठरवलेल्या जागा ओबीसी समाजाला दिल्या. मात्र राष्ट्रवादीने ऐनवेळी जागा बदलल्या. त्याचा त्यांना फटका बसला.