घर Pimpri-Chinchwad देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी

देहू नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी

362
0

देहू – देहू नगरपंचायत (Dehu Nagar Panchayat) सार्वत्रिक निवडणुकीच्या बुधवारी(ता.19) झालेल्या मतमोजणीत 17 पैकी 14 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने जिंकल्या. यासह राष्ट्रवादीने (NCP) एक हाती सत्ता मिळवली. भारतीय जनता पक्षाला एक तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले. या निवडणुकीच्या निकालामुळे आमदार सुनिल शेळके यांचे पुन्हा मावळ तालुक्यात वर्चस्व दिसून आलं.निकालानंतर विजयी उमेदवारांनी भंडाऱ्याची उधळण करत गावातून मिरवणूक काढली. पुण्याचे प्रांताधिकारी संजय देशमुख निवडणुक अधिकारी होते. नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.प्रशांत जाधव,तहसिलदार गीता गायकवाड,नायब तहसिलदार प्रविण ढमाले यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम केले.

देहू ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर पहिल्यादाच निवडणूक होत आहे. त्यामुळे पहिला नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्याचा मान आपल्याला मिळावा,यासाठी 17 प्रभागांतून एकूण 82 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तसेच राष्ट्रवादी कॅाग्रेस, भाजप,शिवसेना आणि कॅाग्रेसने पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली.तसेच तिकिट न मिळाल्याने अपक्ष उमेदवारांची संख्याही जास्त होती. मात्र आमदार सुनिल शेळके आणि मावळ तालुक्यातील नेते मंडळी देहूत तळ ठोकून होते. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी कॅाग्रेसला एकहाती सत्ता मिळाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा