फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब चा १९ वा ट्रेक रविवार दिनांक १६/०१/२०२२ रोजी “मार्कंडा मंदिर ते घोराडेश्वर जंगल ट्रेक ” या ठिकाणी आयोजित केलेल्या होता. “ट्रेक लीडर” म्हणून कालिदास सूर्यवंशी, योग प्राध्यापक लहुजी तावरे व लेखक सुभाष चव्हाण यांनी या ट्रेक मोहिमेचे नेतृत्व केले.या ट्रेक मध्ये ३१ सदस्यांनी भाग घेतला होता.वसंत ठोंबरे, पी एन पुजारी, शिवशंकर देशमुखे, दिलीप कुबडे, सुनिता कुबडे, लहुजी तावरे, अवधूत ढवळे, श्रीरंग दाते, सुभाष चव्हाण, केतन पारख, मनाली पारख, भव्या पारख, जिनम पारख, अंकित नहार, अस्मित नहार, कालिदास सूर्यवंशी, विकास सोनवणे, भास्कर भोयर, राजीव पोरे, नीलिमा पोरे, विनोद जैन, दर्शन जैन, दृष्टी जैन विनोद कुचे, नंदिनी शेवाळे, बापूराव शेवाळे व सौ. मीनाक्षी सूर्यवंशी व पुष्पक सूर्यवंशी इत्यादीच्या सहभाग होता.
सकाळी ६.१५ मिनिटांनी मार्कंडा मंदिरापासून ट्रेकला सुरुवात झाली. वसंत ठोंबरे यांनी सर्व सदस्यांचे ” सर्वांचे हार्दिक स्वागत” करून सुरक्षिततेच्या नियमांच्या सूचना देऊन “जय भवानी जय शिवाजी” व “गणपती बाप्पा मोरया” चा जय जय कार च्या घोषणांचा निनाद करून पाठी मागच्या अवघड वाटेने डोंगर चढण्यास सुरुवात केली.डोंगरावरती निसरड्या व घसरड्या वाटा तुडवत व सुरक्षिततेची काळजी घेत झेंड्या खाली पोहोचलो. पूर्व दिशेला पाहिल्यानंतर सूर्योदय अजून झालेला नव्हता. दाट धुक्याची चादर धरणी मातेने पांघरलेली होती. ट्रेनचा आवाज व शिट्टी ऐकू येत होती. निसर्गाचे नयनरम्य असे दर्शन पाहून मन उल्हासित होत होते.
घोराडेश्वर डोंगरावरती बजाज ऑटो कंपनीने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून लावलेली झाडे आता खूप मोठी झालेली आहेत हे पाहून बजाज ऑटो कंपनीला लाख लाख मोलाच्या शुभेच्छा आमच्या “फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब” तर्फे देण्यात आल्या. त्यानंतर मधल्या वाटेने उतरून शंकराच्या सर्वात वरच्या मंदिराचं दर्शन घेऊन अवघड ायर्यांच्या वाटेने आम्ही सर्वजण घोराडेश्वर च्या मुख्य मंदिरात जवळ आलो तर मंदिर बंद होते. तसेच मंदिराच्या समोर दगडी फरशी बसवण्याचे काम पूर्ण झालेले होते या ठिकाणी योगाची प्रार्थना व ११ ओमकार घेण्यात आले. सर्वांना भूकही बर्यापैकी लागलेली होती. रस्त्यामध्ये “जंगल जिम” या ठिकाणी नाष्टा करून विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये भव्या पारख हिने उत्कृष्ट डान्स सादर केला. सुहास चव्हाण यांनी पिंपरी-चिंचवड शहर यावरती लावणी सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच त्यांच्या “जागर आदिशक्तीचा” व “श्री अष्टविनायक दर्शन” ही दोन पुस्तक श्री वसंत ठोंबरे, निवृत्त क्रीडा अधिकारी, बजाज ऑटो, यांना भेट देण्यात आली. त्यानंतर घोराडेश्वरच्या जंगलातून वाटचाल करत १०.१५ मिनिटाने मार्कंड्या मंदिरा जवळ पोहोचलो.
या ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे ९ वर्षाच्या लहान मुला मुली पासून तर ६८ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा सहभाग होता. तसेच आपल्या सर्वांची शारीरिक क्षमता वाढावी, मोबाईल, टीव्ही व व्यसनापासून सर्वजण दूर राहून निरोगी समाज निर्माण व्हावा व निसर्गाची, गड-किल्ल्यांची आवड निर्माण व्हावी ह्या उद्देशाने फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब ची स्थापना करण्यात आली.