घर Food न खाई भोगी तो सदा रोगी’ भोगीच्या भाजीचे पोषणमूल्य जाणून घ्या

न खाई भोगी तो सदा रोगी’ भोगीच्या भाजीचे पोषणमूल्य जाणून घ्या

440
0

मकर संक्रांतीच्या  आदल्या दिवशी भोगी असते. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! या दिवशी इंद्र देवाची आठवण काढली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रीत बाजरीच्या भाकरीचा आनंद घेत जेवतात.

सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेल्या भोगीच्या भाजीसाठी हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात. यात फोडणीला तीळ असतातच. भोगीला ही भाजी सर्वत्र केली जाते. त्या दिवसाचे महत्व म्हणून भोगीच्या भाजीचा विशेष मान असतो. पण आरोग्याच्या  दृष्टीने आहारात या भाज्यांचे महत्व मोठे आहे.

या भाजीत वालाच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा वापरल्या जातात. त्यात भरपूर फायबर, प्रोटीन असते. नवलकोलमधेही फायबर, ब आणि क जीवनसत्व असते. रताळ्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहींनाही चालते.

या भाजीचा राजा म्हणजे कोनफळ. कोनफळाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यात फायबर, पोटॅशियम जास्त असल्यामुळे मधुमेही, हृदयरोग्यांना उपयुक्त ठरते. अँथोसायनीन किंवा जांभळ्या रंगद्रव्यात अँटीऑक्साडंट गुणधर्म असतात. त्यामुळे कॅन्सरला प्रतिबंध होतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा