घर Pimpri-Chinchwad लक्षणे नसलेल्यांचे गृहविलगीकरण; गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार

लक्षणे नसलेल्यांचे गृहविलगीकरण; गंभीर रुग्णांवर रुग्णालयात उपचार

437
0

पिंपरी : लक्षणे नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना औषधे देऊन गृहविलगीकरणात (Home Quarantine) ठेवले जाणार आहे. केवळ गंभीर रुग्णांनाच महापालिका रुग्णालयात दाखल करुन घेतले जाणार आहे. कोरोना संसर्ग (Corona) झालेल्या रुग्णांबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी (ता. १०) वैद्यकीय विभागासाठी ‘प्रोटोकॉल’ जाहीर केला.

रुग्णालयात तपासणीसाठी येणा-या रुग्णांची प्रथम कोरोना चाचणी करावी. त्याची माहिती ‘मी जबाबदार’ अॅपमध्ये भरावी. बाधित रुग्णाची वैद्यकीय अधिका-यांमार्फत तपासणी करावी. रुग्णास गृहविलगीकरणाची किंवा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे का हे तपासावे. त्यानुसार निर्णय घ्यावा. लक्षणे नसलेल्या रुग्णांस औषधे, वैद्यकीय अधिका-यांचा संपर्क क्रमांक देऊन गृहविलगीकरणासाठी घरी जाऊ द्यावे.

सौम्यलक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये व गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांस रुग्णालयात दाखल करावे. नवीन भोसरी (ओमीक्रॉन बाधित), थेरगाव व जिजामाता रुग्णालय (लहान मुले) आणि आकुर्डी रुग्णालय येथे दाखल करावे. या चार रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्यास आणि वैद्यकीय अधिका-यास रुग्णाला संदर्भित करण्याची गरज वाटल्यास अॅटो क्लस्टर, अण्णासाहेब मगर जम्बो कोविड रुग्णालय येथे संदर्भित चिठ्ठी देऊन पाठवावे.

महापालिका हद्दीतील रुग्णांना प्राधान्य द्यावे. या प्रोटोकॉलमधील सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रोटोकॉलबाबत काही अडचणी असल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा