घर India सातत्याने  इंदौर  स्वच्छ स्मार्ट सिटी मध्ये देशात प्रथम का येत आहे ?

सातत्याने  इंदौर  स्वच्छ स्मार्ट सिटी मध्ये देशात प्रथम का येत आहे ?

462
0

 

यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे उचलेली  महत्त्वाची पावले समजून घ्यावी लागतील.

2017: सन 2017 मध्ये, इंदौर ने प्रथमच घरोघरी कचरा संकलन सुरू केले. प्रत्येक घरातून कचरा उचलण्याचे आव्हान होते. रस्त्यावरील डस्टबीन काढून टाकणे किंवा कमी करणे हा यामागचा उद्देश होता. परंतु हे इंदूर महापालिकेने केले. लोकांनीही खूप साथ दिली.

2018: सन 2018 मध्ये इंदौर शहराला उघड्यावर शौचमुक्त करून ODF पुरस्कार मिळाला. यासह, ओला  आणि सुका कचरा  वेगळे करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले. ओल्या कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिन, सुक्या कचऱ्यासाठी स्वतंत्र डस्टबिन. सफाई कामगारांनी ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सुरुवात केली.

2019 आणि 2020: झिरो वेस्ट ट्रेंचिंग ग्राउंड ही या वर्षातील महत्त्वाची कामगिरी होती. इंदौर मध्ये अनेक वर्षांपासून ट्रेंचिंग ग्राउंडमध्ये पसरलेला 12 लाख मेट्रिक टन कचऱ्याचा डोंगर नष्ट करण्यात आला. 2020 मध्ये, इंदौर महानगरपालिकेने कचरा शुल्कातून 40 कोटींचा महसूल जमा केला. एवढेच नव्हे तर कचऱ्यापासून तयार होणाऱ्या कच्च्या मालातून महापालिकेला वर्षाकाठी दीड कोटींचे उत्पन्नही मिळाले.

लोकांनी भरभरून पाठिंबा दिला : कचरा पसरवणार नाही, पसरू देणार नाही

इंदौर मधील महापालिकेची साफसफाईची यंत्रणा इतकी सुव्यवस्थित आणि वेगवान आहे की शहरात कुठेही घाण दिसत नाही. लोकही प्रशासनाला चांगली साथ देतात आणि कचरा पसरवत नाहीत.

इंदौर महानगरपालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन उत्कृष्ट आहे. अनेक शहरांमध्ये लग्न समारंभ, सभा, रॅली, पत्ते, घाण इत्यादी पसरल्याचे तुम्ही पाहिले असेलच. तर इंदौरमध्ये प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमानंतर लगेच साफसफाई केली जाते.

शहरातील नागरिकांना स्वच्छतेची सवय लागलेली आहे.  येथील लोकांमध्ये स्वच्छते बद्दल जागृती दिसून येते. एखाद्या नवीन व्यक्ती ने रस्त्यावर कचरा पसरवला तर येथिल नागरीक त्यांना कचरा उचलून डसबिन मध्ये टाकण्यास सांगतात.

एकंदरीत येथील नागरिक स्वतः कचरा पसरवत नाहीत आणि इतरांनाही तो पसरवू देत नाहीत. आता हे इतर शहरांवर, अधिकार्‍यांवर, नगरसेवकांवर  आणि तिथल्या लोकांवर अवलंबून आहे की इंदौरसारखे स्वच्छ शहर बनवायचे असेल तर त्यासाठी किती कामाची गरज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा