घर Pimpri-Chinchwad पिंपरी चिंचवड शहरात सणांवर निर्बंध

पिंपरी चिंचवड शहरात सणांवर निर्बंध

459
0

नाताळ सण साजरा करण्याबाबत आयुक्तांकडून नियमावली जाहीर

विश्व सह्याद्री न्यूज, पिंपरी : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळावर देखील ओमायक्रॉनचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने सण साजरे करण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी नागरिकांना केले आहे. नाताळ सण साजरा करण्यासाठीही ठराविक नियमांचं सर्वांना पालन करावं लागणार आहे.

आदेशात ख्रिश्चन बांधवांनी या वर्षी देखील नाताळचा सण खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने करावा. स्थानिक चर्चमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या मासमध्ये ५० टक्के लोकांना चर्चमध्ये उपस्थित राहण्यास परवानगी जास्त जणांचा समावेश नसावा. कोणत्याही वेळेत चर्चमध्ये गर्दी होणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी. सुरक्षित शारीरिक अंतर अर्थात फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासोबतच चर्च परिसराचं नियमितपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करणं अनिवार्य आहे.

चर्चमध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी मास्कचा वापर बंधनकारक. चर्चमध्ये प्रभू येशुचं स्तुतीगीत गाण्यासाठी कमीत कमी गायकांचा समावेश करावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करावा. चर्चच्या बाहेर परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नये. कोणत्याही प्रकारे गर्दीला आकर्षित करणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि मिरवणूकीचे आयोजन करु नये. फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये. नाताळ सणासाठी आखून दिलेल्या या नियमावलीचं पालन करत नागरिकांनी प्रशासनाला मदत करत करावी, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा