घर Uncategorized प्रांताध्यक्षां समवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा

प्रांताध्यक्षां समवेत शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा

40
0

पिपंरी दि. १८,
काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आ.श्री. नाना पटोले यांची आज सोमवारी मुंबई येथील निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिका-यांनी भेट घेतली. डॅा.कैलास कदम यांच्या काँग्रेस शहर अध्यक्ष पदीनिवडीबाबत शॅाल व पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले व पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला.

या वेळी पक्ष संघटनात्मक बांधणी व आगामी कामकाजाबाबत पटोले यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, चर्चेत नाना पटोले यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकी बाबत मार्गदर्शक सूचना दिल्या व शहरात काँग्रेस संघटना वाढीच्या ठळक बाबी व विशेष तंत्रे समजावून सांगितली व शहरात येऊन बैठक घेण्याबाबतची पदाधिका-यांची विनंती मान्य करत लवकरच शहरात येऊ असा विश्वास दिला.
या प्रसंगी कैलास कदम यांनी आगामी महानगरपालिका निवडणूकीत उत्तम यश मिळविण्याबाबत ची तयारी व नियोजन याबाबत पटोले यांनी माहीती दिली.

या प्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव पृथ्वीराज साठे, काँग्रेस चे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, प्रदेश काँग्रेसचे सदस्य अमित मेश्राम व युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे आदि उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा