घर Politics शरद पवार उद्यापासून उद्योगनगरीत

शरद पवार उद्यापासून उद्योगनगरीत

98
0

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार शनिवार (ता. १६) व रविवार (ता. १७) पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर येत आहेत. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या हस्ते राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महापालिकेतील भ्रष्टाचार आणि आगामी महापालिका निवडणुकीची व्यूव्हरचना ठरविण्यासाठी शहरातील ‘राष्ट्रवादी’च्या ज्येष्ठ नेत्यांनी शरद पवार यांची गेल्या आठवड्यात भेट घेतली होती. त्या वेळी त्यांनी शहरात येण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शनिवार व रविवार ते शहरात येत आहेत. त्याबाबत वाघेरे म्हणाले, ‘‘शनिवारी दुपारी साडेतीनला आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड स्टेशन येथील कार्यालयात शरद पवार येतील. तिथे राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांचे उद्घाटन करतील. त्यानंतर पक्षाची शहर कार्यकारिणी व आजी-माजी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. रविवारी दुपारी चारला रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा होईल. ’’

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा