घर Editorial पुण्याचे नवे जिल्हाधिकारी – डाॕ. राजेश देशमुख

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी – डाॕ. राजेश देशमुख

113
0

विश्व सह्याद्री, पुणे :

पुण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून डाॕ.  राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्याजागी जिल्हाधिकारी म्हणून डॉक्टर राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी असलेले डॉ. राजेश देशमुख हे हाफकिन इन्स्टिट्युटचे  व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. 2008 च्या बॅचचे ते आहेत. डॉ. देशमुख यांनी एमपीएससी परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारी पदापासून शासकीय सेवेला प्रारंभ केला होता. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही देशमुख यांनी काम केले आहे. पदोन्नती झाल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची जबाबदारी मिळाली.

त्यांच्या कार्यकाळात सातारा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आलेख उंचावत गेला. स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना या योजनांची दखल अवघ्या 14 महिन्यात देशपातळीवर घेतली गेली.  याचबरोबर ‘कॉटन सिटी’ अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची देशभरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे कॅपीटल अशी ओळख झाली. मात्र, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्यामुळे २०१८ या एका वर्षात या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा आकडा तब्बल १२९ नी कमी झाला आणि डॉ. राजेश देशमुख हे नाव राज्यभर झाले. त्यानंतर हाफकिनचे व्यस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कामाची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून त्यांनी पुणे जिल्ह्यात काम करण्याची संधी देशमुख यांना दिली आहे.

आतापर्यंत पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून शिवाजीराव देशमुख, प्रभाकर देशमुख आणि विकास देशमुख यांनी काम पाहिले आहे. आता डॉक्टर राजेश देशमुख हे पुण्याचे चौथे देशमुख जिल्हाधिकारी ठरणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा