घर Breaking News महापालिका सुरक्षा कर्मचाऱ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन

महापालिका सुरक्षा कर्मचाऱ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन

95
0
Old Security Guard  - hansdakbimal1 / Pixabay
hansdakbimal1 / Pixabay
नियमित मासिक वेतन मिळत नसल्याचा आरोप
पुणे/ प्रतिनिधी
महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागामध्ये कार्यरत असलेल्या माजी सैनिकांना वर्षानुवर्षे नियमित मासिक वेतन मिळत नाही. वेळेवर मासिक वेतन न मिळाल्याने उपचारास विलंब झाल्याने मृत्यूचे प्रकारही घडले आहेत, असा आरोप करीत त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी महानगरपालिका भवनासमोर   माजी सैनिक कामगार युनियनचे अध्यक्ष डॉ. सुधाकर पणीकर हे आमरण उपोषण आणि   ‘भीख मांगो’ आंदोलन सुरू केले आहे. .
उच्च न्यायालय व राज्य शासनाच्या आदेशानुसार ७१ माजी सैनिक कर्मचारी यांना तातडीने कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेण्यात यावे.  ज्या कामासाठी कर्मचाऱ्याची नेमणूक केली तेच काम त्यांना देण्यात यावे. स्थायी समितीची मंजुरी असूनही मनमानी करून कर्मचाऱ्यांचे वेतनामधून कपात केलेला  युनियनचा खर्च ६ महिन्याला १५०० रुपये तसेच प्रवासभत्ता दरमहा १००० रुपये ही रक्कम तातडीने देण्यात यावी. यापुढे देखील ही कपात न करण्याची हमी द्यावी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेप्रमाणे पुणे महानगरपालिकेमध्येही माजी सैनिक कर्मचाऱ्यांना दरमहा २५ हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे. पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे माजी सैनिक कर्मचारी यांना पीएफ व ईएसआयचा भरणा करण्याचा आदेश देण्यात यावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा