घर Breaking News पवना धरण ५९ टक्के भरले!

पवना धरण ५९ टक्के भरले!

96
0
Dam Water Forest Mountains  - HansLinde / Pixabay
HansLinde / Pixabay

विश्व सह्याद्री, पवनानगर (मावळ) :
मागील आठवड्यापासून धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पवना धरण गुरूवारी सायंकाळी ५९ टक्के भरले.

मावळातील पवना , इंद्रायणी , सुधा , कुंडलिका या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत . पवना , वलवण , तुंगार्ली , शिरोता , उकसान , जाधववाडी , लोणावळा , मळवंडीठुले , कासारसाई , आढले या धरणांच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे . लोणावळ्यात २४ तासांत १५७ मिमी पावसाची नोंद झाली असून यंदा  आजपर्यंत केवळ २५१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे .

गत वर्षी सुमारे ४९८३ मिमी पावसाची नोंद झाली होती . पवना धरण पाणलोट क्षेत्रात दिवसभरात २७ मिमी पावसाची नोंद झाली . धरणाचा पाणीसाठा ५९ टक्के इतका झाला आहे . गत वर्षी आजअखेर धरणाचा साठा ९६ टक्के झाला होता. लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून पुन्हा पाणी ओसंडून वाहू लागले आहे .

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा