घर Breaking News जिल्ह्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता

जिल्ह्यात स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता

111
0
Vaccine Nurse Covid  Corona  - Ray_Shrewsberry / Pixabay
Ray_Shrewsberry / Pixabay
तासिका तत्वावर खाजगी डॉक्टर्सकडून सेवा
पुणे/ प्रतिनिधी
शहराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीणभागातही करोनाबाधितांची संख्या वाढत असताना जिल्हा परिषदेकडे तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. कंत्राटी पद्धतीने  नियुक्तीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीला अल्प प्रतिसाद मिळाल्याने प्रति तास मानधन देऊन खाजगी डॉक्टरांची सेवा घेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या २०४ पदांसाठी जाहिरात दिली असता केवळ ६ जणांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत.
जिल्हा परिषदेच्या वतीने डॉक्टर्स, परिचारिका, मदतनीस अशा १ हजार १२४ वैद्यकीय पदांवर ३ ते ६ महिने कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज दाखल करण्यासाठी १६ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. मात्र, त्यापैकी केवळ ४१० पदांसाठी उमेदवार मिळाले आहेत. सुपर स्पेशालिटी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी घेतल्या जाणाऱ्या NEET परीक्षा दि. १५ सप्टेंबर रोजी होणार असल्यानेही डॉक्टरांकडून या जाहिरातीला प्रतिसाद मिळण्यास अडचणी येत आहेत.
या पार्श्वभूमीवर करोनाच्या संकटकाळात पुरेशा प्रमाणात वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध व्हावे या दृष्टीने जिल्हापरिषदेने तासिका तत्वावर खाजगी डॉक्टरांकडून
सेवा घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात सध्या १ हजार डॉक्टर्स कार्यरत असून आगामी १० दिवसात प्रत्येक तालुक्यात दोन विशेष कोविड आरोग्यसेवा केंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात असून खाजगी डॉक्टरांना करोनाबाधितांवर उपचारासाठी सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा