घर Entertainment खाद्य पदार्थात आढळली सुतळी हॉटेल चालकाला ५० हजारांचा दंड

खाद्य पदार्थात आढळली सुतळी हॉटेल चालकाला ५० हजारांचा दंड

113
0
Ball Of String String Yarn Ball  - ClaradoodlaK / Pixabay
ClaradoodlaK / Pixabay
विश्व सह्याद्री, पिंपरी  : ग्राहकाला दिलेल्या
समोशामध्ये सुतळी आढळल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने देहूरोड बाजारपेठेतील “अशोका स्वीट अँड रेस्टॉरंट’ चालकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे देहूरोडच्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
 माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांकडे तक्रार केली होती.  गेल्या वर्षी ११ ऑगस्ट २०१९ रोजी सावंत यांच्या पुतण्याने देहूरोड बाजारपेठेतील अशोका स्वीट अँड रेस्टॉरंटमधून २० समोसे आणले होते. यातील एक समोसा लहान मुलगा खात असताना त्याला   समोशात  सुतळी आढळून आली. हा प्रकार सावंत यांनी तातडीने संबंधित हॉटेल मालकाला सांगितला तसेच समोसा आणि त्यात आढळून आलेली सुतळीही दाखवली. मात्र, त्याने याकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे सावंत यांनी थेट अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांकडे तक्रार केली. या तक्रारीची तातडीने दखल घेत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न व औषध निरीक्षकांनी  अशोका स्वीट अँड रेस्टॉरंटची तपासणी केली. तसेच हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाच्या  न्याय निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल  केले.
त्यावर न्याय निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल मालकाला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईचे पत्र नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती स्वतः संजय सावंत  यांनी दिली आहे.
समोशात सुतळी आढळल्यानंतर अशोका स्वीट अँड रेस्टॉरंट विरोधात तक्रार केली होती. त्यानंतर माझ्यावर प्रकरण मिटविण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, हा सर्व प्रकार ग्राहकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने मी तक्रारींवर ठाम राहिलो. अखेर या प्रकरणात संबंधित हॉटेलला दंड ठोठावण्यात  आला. शहरातील अन्य हॉटेल व्यवसायिकांनी याचा बोध घ्यावा. या पुढे असे प्रकार आढळून आल्यास पुन्हा तक्रार केली जाईल. संजय सावंत : माहिती अधिकार कार्यकर्ता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा