घर Breaking News करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून शाळांमध्ये होणार ध्वजारोहण

करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून शाळांमध्ये होणार ध्वजारोहण

113
0

विश्व सह्याद्री, पिंपरी
करोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा शहरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांशिवाय शनिवारी (दि. १५) ध्वजवंदन कार्यक्रम होणार आहे. संबंधित कार्यक्रम हा सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून केला जाणार आहे.

महापालिका शिक्षण विभागाकडून काही नियम निश्चित केले आहेत. ध्वजवंदनाचा कार्यक्रम शाळास्तरावर सकाळी ८.३५ पूर्वी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा स्तरावर संबंधित कार्यक्रमासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. सर्वासाठी मास्क बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी शाळेत बोलावण्यात येऊ नये, प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (कन्टेन्मेंट झोन) शाळा असू नये.

संबंधित कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्यासह कमाल ५ व्यक्ती ध्वजवंदन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. खासगी व महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांशिवाय हा कार्यक्रम घेण्याच्या सूचना अंमलबजावणी करावी, असे महापालिका शिक्षण विभागाच्या (प्राथमिक) प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या १०५ प्राथमिक आणि १८ माध्यमिक शाळांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. संबंधित ध्वजवंदन कार्यक्रमास गर्दी होणार नाही, याबाबत आयोजकांनी दक्षता घ्यावी. राज्य सरकारने काढलेल्या परिपत्रकानुसार सर्व सूचनांचे ध्वजवंदनाचा कार्यक्रम घेण्यात यावा, असेही शिंदे यांनी नमूद केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा