घर Breaking News इस्रो स्मार्ट इंडीया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईआरचा प्रथम क्रमांक

इस्रो स्मार्ट इंडीया हॅकेथॉन स्पर्धेत पीसीसीओईआरचा प्रथम क्रमांक

105
0
Medal Trophy Achievement Award  - qimono / Pixabay
qimono / Pixabay

एसव्ही ग्रॅव्हिटी टिमने प्रथम क्रमांकासह एक लाखाचे बक्षिस पटकविले
पिंपरी, पुणे (दि. 13 ऑगस्ट 2020) इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) आयोजित केलेल्या ‘स्मार्ट इंडीया हॅकेथॉन 2020’ या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँण्ड रिसर्च (पीसीसीओईआर) या महाविद्यालयाच्या ‘एस‌. व्ही. ग्रॅव्हिटी’ या टीमने प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे बक्षिस पटकविले.
इस्रो ही संस्था अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीस चालना मिळावी यासाठी स्मार्ट इंडीया हॅकेथॉन स्पर्धांचे आयोजन करीत असते. या वर्षीच्या ऑनलाईन स्पर्धेत देशभरातून 53 संघानी सहभाग घेतला होता. यामध्ये पीसीसीओईआरच्या श्रीपाद आगाशे, आशुतोष राणे, कुणाल भालेकर, सोनाली उबाळे, पार्थ बोराटे आणि श्रृतिका सरवदे या विद्यार्थ्यांच्या ‘एस.व्ही. ग्रॅव्हिटी’ या टिमने ‘एनएम 385’ च्या ‘व्ह्युज्वलायझेशन ऑफ अर्थ ॲण्ड मून इन व्हर्च्युअल रिॲलीटी’ हा प्रोजेक्ट सादर केला होता.
पीसीसीओईआरमध्ये प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आणि रिसर्च बेस्ड एज्युकेशन शिकविले जाते. यातूनच विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन संकल्पना उदयास येतात. विद्यार्थ्यांना नाविन्यपुर्ण संशोधन आणि झालेल्या संशोधनाचे पेटंट नोंदणीसाठी तसेच त्याचे स्टार्टअप, उद्योग, व्यवसायात रुपांतर करण्यासाठी पीसीईटीचे विश्वस्त मंडळ व महाविद्यालयाचे प्राध्यापक नेहमी मार्गदर्शन करतात.
या टिमला पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी, प्रा. अर्चना चौगुले, प्रा. जमीर कोतवाल आणि समन्वयक प्रा. अच्युत खरे यांनी मार्गदर्शन केले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव व्हि.एस. काळभोर, खजिनदार एस.डी. गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा