पिंपरी, पुणे (दि. २४ सप्टेंबर २०२३) : पिंपरी चिंचवड येथील ज्येष्ठ माजी पत्रकार आणि अल्पावधीत कायदा क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ॲड. संजय गणपत माने यांची सातारा जिल्हातील जागतिक पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या कास पठार या पर्यटन स्थळावर कार्यरत असलेल्या कास पठार कार्यकारी समितीवर कायदा सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे.
ॲड. संजय माने हे पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील अनेक कामगार संघटना, विविध ट्रस्ट आणि सामाजिक संस्था, गृह निर्माण संस्था, शिक्षण संस्था, नामांकित कंपनी चे कायदा सल्लागार आहेत.
ॲड. माने यांची निवड झाल्याबद्दल पिंपरी चिंचवड बार कौन्सिलच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.