Home India १४ ते १८ डिसेंबर रोजी किसान कृषि प्रदर्शन मोशी येथे

१४ ते १८ डिसेंबर रोजी किसान कृषि प्रदर्शन मोशी येथे

0
१४ ते १८ डिसेंबर रोजी किसान कृषि प्रदर्शन मोशी येथे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पिंपरी : भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन “किसान” १४ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे आयोजित होत आहे.

१५ एकर प्रदर्शन क्षेत्रावर ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, ५ दिवसांमध्ये देशभरातून दिड लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे .

किसान प्रदर्शनाला कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य व इतर शेती क्षेत्रातील मान्यवर संस्थांचा सहभाग व सहकार्य लाभले आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या ८० हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील..

 

किसान मेळाव्यात कृषी स्टार्टअप्सचे स्पार्क दालन हे प्रमुख आकर्षण असेल. 60 हून अधिक कृषी स्टार्टअप्स येथे त्यांचे नवीन तंत्रज्ञान आणि संकल्पना सादर करतील. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागा अंतर्गत स्मार्ट प्रकल्प या स्टार्टअप्स आणि महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमध्ये संवाद सुरू करत आहे.

पूर्वनोंदणी : प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी, मोबाईल ॲपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क रु. १५०/- आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा किसान मोबाईल ॲपवर सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. ( रु. १०० ) पूर्वनोंदणीची संख्या १००,००० ओलांडण्याची अपेक्षा आहे.

प्रदर्शकांची माहिती व संपर्क : किसान मोबाईल ॲपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती उपलब्ध आहे. नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा प्रदर्शक संस्थांशी संवाद प्रदर्शनाच्या आधीपासूनच सुरु झाला आहे.

किसान प्रदर्शनाचे उदघाटन बुधवारी १४ तारखेला सकाळी ९ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या वर्षी किसान प्रदर्शन मोशी येथे नवीन बनत असलेल्या अद्ययावत खुल्या प्रदर्शन केंद्रात होत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणतर्फे विकसित होत असलेले ह्या केंद्राचे काम बी.जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. मोशी येथील प्रदर्शन स्थळ हे पुणे शहरापासून सुमारे २० कि. मी. अंतरावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here