मुंबई: प्रतिनिधी
हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला फायटर हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच अडचणीत आला आहे. संयुक्त अरब अमिराती वगळता अन्य आखाती देशांनी या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभक्तीची प्रेरणा घेऊन साकारण्यात आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. त्यांनी यापूर्वी पठाणसारखा ब्लॉकबस्टर सिनेमा सादर केला आहे. पठाणाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई केली. मात्र, फायटर प्रदर्शनापूर्वी अडचणीत आला आहे.
फायटर हा ॲक्शनपॅक्ड चित्रपट उद्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलेला या चित्रपटाचा ट्रेलर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरला आहे. देशभक्तीच्या भावनेबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रीत करण्यात आलेले ॲक्शन सीन्स या चित्रपटाचे आकर्षण ठरतील, असा विश्वास निर्मात्यांना वाटत आहे.