Home Pimpri-Chinchwad हिट अँड रनबाबत चालक-मालकांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करावी : बाबा कांबळे

हिट अँड रनबाबत चालक-मालकांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करावी : बाबा कांबळे

हिट अँड रनबाबत चालक-मालकांच्या प्रतिनिधीसोबत चर्चा करावी : बाबा कांबळे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

लोणावळा येथे रिक्षा चालक मालकांचा मेळावा संपन्न

पुणे: प्रतिनिधी

रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांना म्हातारपणी पेन्शन मिळाली पाहिजे, मुक्त रिक्षा परवाना बंद झाला पाहिजे, इ चलन बंद झालं पाहिजे, याबरोबर देशभरामध्ये सध्या सुरू असलेल्या हिट अँड रन प्रकरणी सरकारने रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करावी, चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा केल्याशिवाय, व आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय माघार घेणार नाही, महाराष्ट्रसह देशभरामध्ये स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू झाले असून देशातील चालक-मालक हे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, आंदोलन करणाऱ्या संघटना प्रतिनिधी सोबत चर्चा करण्याऐवजी  सरकार मात्र उद्योगपती आणि भांडवलदार ट्रान्सपोर्टस सोबत चर्चा करत आहेत, यामुळे देशभरातील 25 करोड चालक मालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली यामुळे पुन्हा 9 जानेवारीपासून स्टेरिंग छोडो आंदोलन सुरू करण्यात आले असून सरकारने चालक-मालकांच्या प्रतिनिधी सोबत चर्चा करावी असे आवाहन बाबा कांबळे यांनी सरकारला केले आहे,

लोणावळा येथे महाराष्ट्र रिक्षा पंचायत व लोणावळा शहरातील विविध संघटनेच्या वतीने रिक्षा चालक मालकांचा मेळावा मोठ्या उत्साहांमध्ये संपन्न झाला यावेळी बाबा कांबळे बोलत होते,

यावेळी प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रदीप शिंगारे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबुभाई शेख अध्यक्ष, आनंद सदावर्ते, गुजरात येथील सतीश जागडा आदी उपस्थित होते.

यावेळी बाबा कांबळे म्हणाले महाराष्ट्रातील पंचवीस करोड चालक मालकांनी देशभरामध्ये एक तारखेपासून आंदोलन सुरू केले परंतु सरकारने मात्र ट्रान्सपोर्ट धारकांचे मोठे उद्योगपती ऑल इंडिया मोटर काँग्रेस  यांच्याशी चर्चा करून आंदोलन माघार घेतले असे जाहीर केले. ऑल इंडिया मोटर काँग्रेसने देशातील 25 करोड ड्रायव्हर यांची दिशाभूल करून ज्यांनी आंदोलन सुरूच केले नाही त्यांना आंदोलन माघार घेण्याचा अधिकार नाही. हे आंदोलन देशातील 25 कोटी चालक-मालकांनी सुरू केले आहे परंतु त्यांच्याशी चर्चा न करता ऑल इंडिया मोटर्स काँग्रेसच्या वतीने परस्पर हे आंदोलन मागे घेतले असे जाहीर करण्यात आले यामुळे देशभरातील 25 करोड चालकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे,या मुळे त्यांनी पुन्हा 09 जानेवारी 2024 मध्ये रात्रीपासून महाराष्ट्रात देशभरामध्ये स्टेरिंग छोडो करून चक्काजाम करण्याचा निर्णय देशातील चालक मालकांने घेतला, आहे,  असे बाबा कांबळे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाच्या संयोजनासाठी आनंद सदवरते, विनय बच्चे, भगवान घनवट, विकास खेंगरे, भाऊ शिवेकर वासिम खान चल्लरभाई शेख यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here