
मुंबई: कर्नाटकातील हिजाब वादावरून कायदा व सुव्यवस्था बिघडवणे योग्य नाही. महाराष्ट्रात अशा प्रकरणांवर “अनावश्यक आंदोलने” करू नयेत, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
“मी लोकांना आवाहन करतो की अशा मुद्द्यांवर अनावश्यक आंदोलन करू नका. ही घटना दुसऱ्या राज्यात घडली आहे, त्याचा इथे निषेध करू नये. मी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करतो”, असे ते म्हणाले.
मुंबई पोलिस मुस्लिम धर्मगुरू आणि राजकीय नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना कर्नाटकातील घडामोडींवर प्रतिक्रिया न देण्याचे आवाहन समाजाला करावे, अशी विऊन्टी करण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.