चिंचवड : ‘सोशल हॅंड्स फाउंडेशन’ सामाजिक संस्थेने ‘एकविरा प्रतिष्ठान’ मार्फत १४ विद्या ६४ कलांचा अधिपती श्री गणनायकाच्या वार्षिकोत्सवाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच पारंपरिक व बाळ गंगाधर टिळक यांच्या उद्देशांना अनुसरून गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी नृत्य, निबंध लेखन,चित्रकला, संगीत खुर्ची ई. स्पर्धांचे आयोजन केले होते. त्या अंतर्गत वाल्हेकरवाडीतील विद्यार्थी व नागरिकांनी स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. विविध सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या एकविरा सोसायटीत बक्षीस वितरण सोहळा झाला. ‘सोशल हॅंड्स फाउंडेशन’ संस्थेची मीडिया पार्टनर ‘अद्वैत मीडिया’ या संस्थेचे डायरेक्टर, जर्नलिस्ट नितिन येलमार पाटील, महामेट्रोमध्ये कार्यरत असणारे सोशल हॅंड्स फाउंडेशन’ संस्थेचे सदस्य सचिन अडागळे, सदस्य संदीप घावटे या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व पारितोषिक वितरीत करण्यात आले. स्पर्धकांनी त्यांच्या कलागुणांना वाव मिळून कौतुक झाल्याबद्दल एकविरा प्रतिष्ठानने आभार मानले.
डान्स स्पर्धेतील बक्षीस परी आठवले व विनायक साबळे यांना मिळाले. रांगोळी स्पर्धीतील बक्षीस पल्लवी पाटील व श्रावणी घुले यांना मिळाले.
संगीत खुर्ची स्पर्धेतील पैठणी च्या मानकरी श्रीमती धनश्री शिनगारे ठरल्या.
लिंबू चमचा स्पर्धेतील मुलांमधील बक्षीस श्लोक शिंदे,नीलेश उम्मराणी, अथर्व सरेकर यांना मिळाले. लिंबू चमचा स्पर्धेतील मुलींमधील बक्षीस आराध्या वालकोळी, समीक्षा सरेकर,दिपाली पाटील यांना मिळाले.संगीत खुर्ची स्पर्धेतील मुलांमधील बक्षीस तुषार पतंगे, प्रदीप आहिवले, आदित्य आठवले यांना मिळाले. संगीत खुर्ची स्पर्धेतील मुलींमधील बक्षीस अदिती पतंगे, आर्या सरेकर, आदेशा शेलार यांना मिळाले.
विजेत्या स्पर्धकांना पैठणी, पेन, वही, पुस्तके, कंपासपेटी व इतर शालेपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.