
रक्तातच समाजसेवेची आवड असणाऱ्या स्वतःच्या जीवाशी खेळून कात्रज येथील घाटात चित्त थरारक घडलेल्या घटनेमध्ये सोशल हँड्स फाउंडेशन चे पुणे विभागाचे प्रमुख दत्तात्रय चव्हाण यांनी दीडशे फूट दरीत दुचाकीसह पडलेल्या दोन परगावी मुलांचे जीव वाचवले व त्यांना सुरक्षित हॉस्पिटलमध्ये नेऊन जीवनदान दिले आहे.
ग्रुप मधून मुले फिरायला जात असताना दुचाकी स्वार दोन मुलांची गाडी घसरून कात्रज येथील घाटात दीडशे फूट दरीत कोसळली व इतर साथीदारांची भांबेरी उडाली घाटातील सर्व प्रवासी बघायची भूमिका घेत असतानाच सोशल हँड्स फाउंडेशनच्या दत्तात्रय चव्हाण यांनी मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या दोन मुलांना बाहेर काढण्यात यश मिळवले. त्या दोन मुलांना सुरक्षित हॉस्पिटल मधून ऍडमिट करून घेतले स्वतः पोलीस चौकशीला सामोरे गेले असून या सर्व प्रसंगांमध्ये सर्व जणांना धीर देत परिस्थिती सावरली.